गझल निर्दोष असणे आणि गेयता यांची गल्लत नको. मुळात वृत्तच गेय असेल, तर प्रश्नच उद्भवत नाही. ओळीच्या शेवटचे अक्षर लघु असताना त्याचे पूर्ण उच्चारण केले जाते की संक्षिप्त उच्चारण (म्हणजे यम चे उच्चारण यम् असे की यम असे करतो) यावर गेयता आणि तिच्यातील सुलभता अवलंबून असेल. गेयता 'राखायचीच' असेल तर उच्चारणात लवचिकता आणून राखता येईलच. गझलेतील बाकीच्या शेरांमधील गेयता आणि शेर/ओळी गुणगुणताना भासणारी सुलभता मी निर्देश केलेल्या ओळीत भासत नाही, हे लक्षात आल्यावर मी माझा मुद्दा मांडला आहे नि त्याबद्दल मला खात्री आहे. पण तुम्ही दूरध्वनीवरून मला ती गेयता 'राखून' दाखवल्यास नवल वाटायला नको. त्यामुळे इतकी साधी चर्चा दूरध्वनी वर करून माझा वेळ, पैसा, ऊर्जा यांपैकी कशाचाही अपव्यय करण्याची माझी इच्छा नाही.
मी सुचवलेला बदल अक्षरगण वृत्तात बसतोय की नाही हे मी तपासले नाही, त्याबद्दल मनापासून क्षमस्व; पण मात्रावृत्तात तो बदल नक्कीच वैध आहे. आणि अर्थातच तुमच्या सध्याच्या ओळीपेक्षा मला जास्त प्रभावीसुद्धा वाटतो आहे. मात्रावृत्त निवडावे की अक्षरगण निवडावे ही निवड तुमची. पण ओळ, शेर व आशय अधिक प्रभावी होण्यासाठी मी सुचवलेला बदल मला जास्त योग्य वाटतो आणि त्यामुळे मात्रावृत्त निभावण्यासही हरकत नाही. अक्षरगणात बसत नसेल, तर पर्यायी शब्दयोजनेचा विचार करता येईलच, पण विसरावे असे च्या ऐवजी विसरा मला हे जास्त प्रभावी आहे, हे आशयाच्या नि शेराच्या खुमारीच्या दृष्टीने नाकारता येत नाही.
तंत्राच्या बाबतीत मी कुणाला कसे किती सल्ले द्यावेत, याबाबत मी आपल्याकडून कोणतेही सल्ले घ्यावेत/शिकावे असे मला बिलकुल वाटत नाही.
धन्यवाद.
ता. क. : मराठी साहित्यात मी तरी पल्ला मारलेला नाही गाठलेलाच पाहिला आहे. तुमच्या मराठी साहित्यात तो मारत असल्यास मारोत बापडे! आमच्या मराठी साहित्यात तो गाठतात बॉ!