तुमच्या नावांवरून तुम्ही भक्तीमार्गी आहात हे सरळ आहे त्यामुळे तुम्हाला ज्ञानमार्गाची साधी विधाने अवघड वाटतात.
सगळे आध्यात्म दोन महत्त्वाच्या गोष्टींवर अधारलेले आहे : १) अस्तित्व एक आहे (आकार आणि निराकारानी मिळून) आणि २) आपण शरीरापासून वेगळे आहोत
भक्तीमार्गात प्रत्येकाचा देव वेगळा असतो आणि इथूनच गोंधळाला सुरूवात होते. त्यामुळे सगुण साक्षात्कार हा निव्वळ शब्द आहे. त्यात तुम्ही पुढे लिहीलेले विषय : देव देवतांशी अतिमानस पातळीवरचे संबंध वगैरे म्हणजे तर फारच गोंधळाचे आहे. त्यातून श्रेष्ठ/ कनिष्ठ/ अतिश्रेष्ठ असे मूळात एक असलेल्या अस्तित्वाचे अनेक भाग होऊन न्यूनत्व वाढत जाते आणि भ्रम निर्माण होतात.
शरीर हे काल आणि स्थानबद्ध असल्यामुळे आपण शरीरापासून वेगळे आहोत हा अनुभव फार महत्वाचा आहे. मला स्वतःला ओशोंची कोणतीही भलावण करायची नाही किंवा त्यांनी सांगीतलेल्या ध्यानपद्धतीं विषयी जे गैरसमज आहेत ते दूर देखील करायचे नाहीत. मी स्वतः मला योग्य आणि उपयोगी वाटलेले ध्यानप्रयोग करून बघीतलेले आहेत. तुम्ही केवळ माहितीच्या आधारावर वक्तव्ये केली आहेत. मी लिहीलेले सर्व माझे म्हणणे आहे त्याचा ओशोंशी काहीही संबंध नाही.
कर्मयोग हा एकाग्रतेचा परिपाक आहे. तुम्ही नुस्ते सकाळी फिरायला जाताना निव्वळ फिरणे हाच उद्देश ठेवला तरी तो साधू शकतो. सर्वसामन्य भारतीय माणूस हा कर्माला कंटाळलेला आहे हे तुम्ही कोणत्याही सरकारी आणि राजकीय क्षेत्रात उघडपणे बघू शकता. आपल्या रोजच्या जीवनमानचा दर्जा तुम्ही बघा त्यावरून सगळे लक्षात येइल. व्यावसायिक जगाशी तर माझा रोजचा संबंध आहे तिथे पैसा हा एकमेव महत्त्वाचा विषय आहे. कर्मयोगासाठी आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत हा अनुभव महत्त्वाचा ठरतो नाहीतर कर्म ही नुस्ती जगण्यासाठी चाललेली धडपड होते.
माझ्या मते साधे निवांत आणि अस्तिवाशी एकरूप होऊन आनंदात जगणे म्हणजे आध्यात्म आहे. तुम्हाला पटत असेल तर बघा.
संजय