स्कार्फ नेमक्या कोणत्या कारणासाठी वापरला जातो? शेजारून आई-वडिल जरी चालले तरी ते स्कार्फ मूळे आपल्याच मुलीला ओळखू शकत नाहीत. (पाश्चात्यांचं अंधानूकरण आम्ही करतो ना? इथे पहा, आम्ही चक्क अरब देशातल्या मुस्लिम स्त्रियांचीच फॅशन कॉपी केली आहे. ) चेहरा हा दाखवण्यासाठीच असतो. जर सर्वच मुली स्कार्फ घालून फिरू लागल्या तर 'तेरे चेहरे से नजर नही हटती' किंवा 'ये चांद सा रोशन चेहरा' तत्सम गाणी तर इतिहासजमाच होतील कि! (नाहीतरी ही गाणी कुणाच्या लक्षात आहेत म्हणा! ) उद्या जर मायावती म्हणाल्या कि, 'ताजमहाल हा दिवसेंदिवस घाण होत चाललेला आहे. आपण त्यावर स्कार्फ घालूया'. चालेल हे? एकवेळ मायावती स्वतः स्कार्फ घालूद्यात, चालेल. जी गोष्ट सुंदर आहे ती झाकायचीच कशाला?