<<हा पेपर मी कधीच वाचलेला नाही. ह्या वर्तमानपत्राविषयी एव्हढी कुप्रसिद्धी होती की कधी वाचावासा वाटलाच नाही.>> पूर्वी माझेही मत सौरभसारखेच होते. पण जेव्हापासून संध्यानंद नियमीत वाचायला लागले, तेव्हा कळले की हा पेपर काही तितका वाईट नाही, जितकी त्याची कुप्रसिद्धी होती किंवा आहे.

मी संध्यानंद रोज नाही पण आठ्वड्यातून २-३ वेळा तरी वाचतेच. इतके वेग-वेगळे विषय असतात त्या पेपरमध्ये की ते वाचताना वेळ कधी जातो कळतच नाही आणि मुख्य म्हणजे बातम्या वाचताना डोक्याला ताप नाही........कालचा पेपर आज वाचला तरी काही फरक पडत नाही.

<<विविध सर्वेक्षणाचे निकाल छापून त्याबद्दल उहापोह करणारे हे जगातील एकमेव वर्तमानपत्र असावे. तसेच पान नं. दोन वरचे यशस्वी कसे व्हायचे यासोबतच जीवनात कसे वागायचे याबद्दलचे लेख छान असतात. ते सकारात्मक विचारसरणी निर्माण करण्यास मदत करतात. >> १००% सहमत.

हा पेपर पूर्वी फक्त २ रु.त मिळत असे. आता तो ४ रु. ला मिळतो.... तरिही खपतो हे विषेष.  १०-११ वाजता वाजेपर्यंत संपलेला असतो.

इतरांच माहीत नाही पण मला मात्र हा पेपर खूप आवड्तो..........