सहज सुचलं म्हणुन! येथे हे वाचायला मिळाले:
सचिनने कसोटित सलग चौथे शतक झळकवल्यावर मागच्या पोस्ट मध्ये मी म्हणालो होतो कि "सचिनद्वेष्ट्यांनी सचिनच्या नावाने बोटे मोडणे थांबवा कारण सचिन सगळ्याच्या पलीकडे गेलाय! उगीच तुमचे ब्लडप्रेशर वाढवुन घेऊ नका. सचिन इतकं क्रिकेट खेळलाय इतकं क्रिकेट खेळलाय कि उद्या एखाद्या सामन्यात लंच नंतर नॉन स्ट्रायकर एंड ला उभं राहुन दात कोरत कोरत एखाद - दुसरी ढेकर दिली तर तीहि त्याच्या रेकॉर्डवर येईल!" सचिन ते इतकं मनावर घेईलसं वाटलं नव्हतं. आज सचिन जे काहि खेळलाय ते आधी कोणी पाहिलं नव्हतं नंतर कोणी पाहिल याची शक्यता जवळपास नाहिये. आमच्या पिढीचं भाग्य आहे ...
पुढे वाचा. : किमयागार