१९७५ च्या आसपास श्री फार फॉर्मात होते. श्री आधी बहुधा मासिक होते नंतर त्याचे साप्ताहिक झाले. त्यातही अशा सनसनाटी बातम्या (? ) देत असत. अंगात येणे, भूतबाधा, भानामतीचे प्रयोग, कुत्री खाणारी माणसे आणि काय काय! (माझ्या आठवणीप्रमाणे चंद्रकांत काकोडकरांची एखादी कादंबरीही क्रमशः असे) सुशिक्षित (आणि उच्चविद्याविभूषितही) लोक ते वाचून लक्षात ठेवून, प्रसंगी त्यातले संदर्भ देतानाही पाहिलेले आहेत.
आनंद (आज का आनंद) हे आम्ही माध्यमिक शाळेत असताना अगदीच प्राथमिक अवस्थेत होते. हिंदी आणि मराठी असा संमिश्र मजकूर असे. काही शिक्षकांबद्दल काही मजकूरही त्यात प्रसिद्ध झाला होता. कदाचित संध्यानंद ही त्याचीच पुढची पायरी असावी असे वाटते.