एखाद्या समकक्ष स्त्री-पुरुषाशी बोलताना गुजराथी स्त्री आपल्या नवऱ्याचा उल्लेख 'तमारा भाई' म्हणजे तुमचा भाऊ असा करते. इतकेच काय की, गुजराथी पुरुष आपल्या मित्रापाशी स्वतःच्या आईचा उल्लेख 'तमारी बा' म्हणजे तुझी आई असा करतो.
महाराष्ट्रीय लोक त्या मानाने फारच पुढारलेले. आपल्या संस्कृतीतले इकडून-तिकडून व इकडची स्वारी-तिकडची स्वारी इतिहासजमा झाली आणि आता तर 'हे' , 'आमची ही' 'कुटुंब', 'मंडळी', 'खटलं(हा बहुधा कलत्रचा अपभ्रंश असावा!)सुद्धा दुर्मीळ व्हायला लागले आहेत.
या संदर्भात नुकताच घडलेला एक किस्सा : साडीच्या दुकानातली बाई थोड्याथोड्या वेळाने आपल्या गण्याला(नवऱ्याला ) नावाने हाका मारून, बाहेर उभ्या करून ठेवलेल्या गाडीतून काहीकाही आणायला पाठवत होती. साडीखरेदी संपून गठ्ठा बांधून झाल्यावर दुकानदार म्हणाला, "अरे गण्या, नुसतं बघतोयस काय, जा, ह्या साड्या गाडीत ठेवून ये." 
यावर आपल्या सभासदांचे, विशेषतः स्त्रीसदस्यांचे काही भाष्य?