मुंबई शहराचा जेव्हा बोंबे म्हणून उल्लेख होतो तेव्हा त्याला या मंडळींचा विरोध असावा; जेव्हा बाँबे एखाद्या विशेषनामाचा भाग असते तेव्हा विरोध करीत नसावेत. बाँबे स्टेशनरी मार्ट, बाँबे डक्(बोंबील), बाँबे नावाचा ब्लडग्रुप, वगैरे. अर्थात, या न्यायाने बॉंबे स्कॉटिश नावाची शाळा, बोंबे युनिव्हर्सिटी, बाँबे बझार नावाचे दुकान ही नावेही चालायला हवीत. मुंबै बँक नावाची बँक याच कारणासाठी चालत असावी. इंडिया इंक, इंडिया रबर, इंडियन रेड(=आयर्न ऑक्साइड) यांना अजून विरोध झालेला दिसत नाही.--अद्वैतुल्लाखान