कथा वाचून काही मनोगतींची आठवण झाल्यासारखे वाटले.

शेवट चाकोरीबाहेरचा आहे, प्रश्नच नाही, त्यामुळे कथा आवडली.

पण काही गोष्टी नमूद कराव्याश्या वाटतात...
१. मध्ये आलेले चॅट वरचे संवाद उगाच फाफट पसारा वाटतात. कथा पुढे सरकण्याच्या दृष्टीने अनावश्यक!

२. इस्पितळ/हॉस्पिटल हा शब्द मराठी आणि इंग्लिश दोन्ही मधून वापरण्यात आला आहे... आणि मेसेंजर साठी मात्र निरोपक. हे विसंगत आहे. अजूनही काही शब्द आहेत. असे शब्द संपूर्ण कथेत (मराठी किंवा इंग्लिश कोणत्याही) एकाच भाषेत वापरले तर ते कथेमधले वेगनियंत्रक आल्यासारखे वाटणार नाही.

३. पात्र मधूनच नाव बदलते! (पात्रच आहे!)

एकूण प्रयत्न आणि कल्पना दोन्ही छान. कथेतले काही परिच्छेद उत्तम आहेत. तुमच्या पुढच्या कथेची वाट पहात आहे. येत्या कथे साठी तुम्हाला शुभेच्छा!