raje nikhil येथे हे वाचायला मिळाले:
कधी कधी आपण स्वत: मधे इतके गुरफटून जातो की अवती भवति च्या चांगल्या गोष्टीं कड़े आपलं लक्षच नसतं. मग कधी तरी एखादी व्यक्ति असं काही काम करते की आपल्याला खाडकन जाग येते. मग लक्ष्यात येतं की आपल्या काळज्या किती शुल्लक आहेत. आयुष्यात या छोट्या छोट्या आणि फालतू काळज्या करत बसण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष्य दिल की आपल्या कर्तुत्वला पैलू पडतात. आपली संकुचीत मति खुली होते आणि आपले विचार देखिल बदलतात.