श्री मराठीप्रेमी,
तुम्ही आयुष्याच्या सुरवातीलाच अपयश आले म्हणून निराशावादी होऊ नका. अपयशाची अनेक कारणे असतात. त्यातली काही मानवनिर्मितही असतात. आपली मते मुलांवर लादणे हे त्यापैकी एक कारण आहे. प्रत्येक माणसात काहीतरी टॅलंट असतोच. पण आपल्याला कशात गती आहे हे समजत नसल्यास ऍप्टिट्युड टेस्ट द्यावी. एकदा तुम्हाला आवडीचा विषय मिळाला की बघा कशी वेगाने प्रगती होते ते! आणि त्यासाठी रुढ चाकोरीबद्ध पदवीच्या मागे लागायची जरुर नाही. आता अनेक विषयांचे अनेक कोर्सेस् उपलब्ध आहेत. माणूस जितका जास्त शिकतो तेवढा तो जास्त घाबरट होतो असे माझे स्वानुभवावरून मत आहे. मग तो कुठलाही धोका पत्करायला तयार नसतो. तेंव्हा स्वतःचा शोध घ्या. तुम्हाला मनापासून काय आवडते तेच करा मग जग काहीही म्हणो! असो. सकारात्मक विचार करायला शिका.
'जुन्या मधुचंद्र सिनेमात एक गाणे होते, " झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा".
यशस्वी व्हा, लायक का नालायक, सुपुत्र की कुपुत्र हे आपोआप विसरून जाल.