आपल्या सूचनांसाठी व प्रोत्साहनासाठी आपणा सर्वांचे आभार. आपणा सर्वांच्या मदतीनेच माझे लेखन सुरु आहे.
यापुढील कथा लिहीताना या पटलेल्या सूचना ध्यानात ठेवेन. कथेत शब्द एकाच भाषेतील असतील तर अधिक चांगले ही सूचना योग्य आहे, मराठीच वापरायचा प्रयत्न करेन, शेवटी प्रयत्नांनीच असे शब्द मराठीत रूढ होतील व आपलेसे वाटतील. जे शब्द आपलेसे झाले होते ते मराठीत चटकन आले व काही प्रयत्नपूर्वक आणावे लागले असते, तेवढा प्रयत्न केला नाही हे मी खेदाने मान्य करते.
भोमे काका म्हणतात तसे कथेतील नाव बदलणार पात्र पात्रच आहे!!!(अगदी माझ्यासारख दिसतय अस वाटतय ))
सोनाली