प्यार के मोड पे.. (येथे ऐका)
चित्रपट परिंदा.. आशाताई-पचमदा जोडीचं एक Rich गाणं!
गाण्याची चाल, एरेंजमेंट वगैरे सगळं अगदी खास पंचमदा ष्टाईल. या गाण्याबद्दल आशाताईंना दाद द्यावी तितकी कमीच.. ज्या अंदाजाने त्यांनी हे गाणं गायलं आहे तो अगदी खासच.. पंचमदांच्या चालीला अगदी पुरेपूर न्याय दिला आहे.. सुरेलता, शब्द टाकण्याची पद्धत, गाण्यातल्या खास जागा..! आशाताईंची जादुई सुरेलता आणि गायकी.. खूप सुंदर भाव ओतले आहेत त्यांनी या गाण्यात.. सुरेश वाडकरांनीही छान संगत केली आहे..
सांजवेळचं समुद्रकिनाऱ्यावरचं सुंदर चित्रिकरण!.. स्वप्नसुंदरी माधुरी तर केवळ लाजवाब! तेजाब, परिंदा, बेटा, साजन.. माधुरी खासच दिसली आहे..
'अन्ना'नानाचा परिंदा चित्रपटही मस्तच होता..! एका जमान्यात हिंदी चित्रसृष्टीत नंबर वन स्थान प्राप्त करणाऱ्या माधुरीचा आणि स्वत:चा खास ठसा उमटवणाऱ्या मराठमोळ्या नानाचा मिसळपावला अभिमान वाटतो..
-- तात्या अभ्यंकर