जावडेकरसाहेब आकडेवारी देऊन विरोधकांचीं तोंडे बंद केल्याबद्दल धन्यवाद. मुख्य म्हणजे सचीनची ज्यांच्याशी तुलना केली जाते त्या पाँटिंगसारखी त्याला पंचांची मेहेरबानी लाभलेली नाहीं. ब्रॅडमनलाही ती लाभली नसेलच असें आपण सांगूं शकत नाहीं. त्याच्या उमेदीच्या वर्षांतली कांहीं वर्षें मॅच फिक्सिंगच्या त्रासदायक वातावरणांतली आहेत. दुखापतींमुळें तसेंच गांगुलीच्या राजकारणामुळेंही त्याचा खेळ बराचसा झाकोळला होता असें दिसतें. आतां कुंबळे आणि धोनीसारखे चांगले कर्णधार मिळाल्यावर त्याचा पूर्वींचा नैसर्गिक खेळ पुन्हां बहरला आहे. या कर्णधारांचे तसेंच निवड समिती, मंडळाचे सदस्य यांचे पण सचीनला योग्य असें निरोगी वातावरण दिल्याबद्दल आभार मानायला पाहिजे.
शोएब अख्तरची प्रतिक्रिया फारच बोलकी.
सुधीर कांदळकर