आहेत. सीमावर्ती भागांतले लोक बोलतात मराठी पण लिंगवचन विभक्ती कन्नडप्रमाणें चालवतात. आमची सौ कारवारची. तो खीर, तो झुरळ, तो पावडर अशीं मजेशीर रूपें तिच्या बोलण्यांत अजूनही असतात. मीं आईकडे घरी आल्यावर सोबत सौ नसल्यास माझे बंधूभगिनी 'तुझा बायको पावडर संपला म्हणून आणायला गेला, पण झुरळ आला आणि त्याला घाबरून खिरीत पडला' असें कांहींसे बोलून धमाल उडवत.
एकदां एका माणसाला मीं बसमध्यें कन्नडमध्यें लिहिलेलें दाखवलें आणि विचारलें कीं काय लिहिलेंलें आहे. 'तें शीट कंडक्टरचं आहे' असें उत्तर आलें.
सुधीर कांदळकर