आपण मराठी मध्ये वडिलांच्या भावाला, मित्राला किंवा शेजारी कोणी वडिलमाणूस असलं की त्यांना 'काका' म्हणतो आणि   काकांच्या बायको ला 'काकू' म्हणतो. पण बंगाली मध्ये वरील सगळ्या पुरुष नात्यांना 'काकू' म्हणतात आणि त्यांच्या बायकांना 'काकीमां' म्हणतात. माझा नवरा बंगाली आहे. मी पहिल्यांदा जेव्हा माझ्या नवऱ्याला त्याच्या काकांना "काकू" असं हाक मारताना ऐकलं तेव्हा फार हसू आलं होतं.