प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार.
टिप्पणीबद्दल
गझलेत लय आणि वृत्त काटोकोरपणे पाळणे आवश्यक आहे या मताशी मी सहमत आहे. मी त्यासाठी अधिक प्रयत्न करेन.
(काहींना श्वास घेतो तेवढी सहज लय कळते , पाळता येते , मला जास्त प्रयत्न करावे लागतात. आणि तरी चुका होतातः) )
राहिला मुद्दा शेर कळण्याचा - माझ्या गझलात असे अवघड काही असते याचा मला अंदाज नव्हताः)
ही गझल आणि आपण नमूद केलेले शेरही स्पष्ट आहेत असे माझे मत आहे. त्यांचा खुलासा मी करणार नाही. लिहितांना किमान एक सोपा अर्थ कळवा असे मनात ठेवून मी कविता/ गझल आहे अथवा नाही ते बघते. एका वाचकाला ते कळले नाहीत म्हणजे त्यात स्पष्टपणा आणखी हवा असे मानायला जागा आहे . पण एखाद्याला आशय भावला नाही याला कुठलाच कवी काही करू शकत नाही. न कळण्याच्या प्रश्नावर मी अधिक स्पष्ट असेल असे लेखन करणे हा उपाय आहे, पण दोन व्यक्तींची आवड वेगळी असू शकते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला सर्व लेखन आवडेल याची शाश्वती नाहीच.आशय न कळण्याने आवडले नाहीत असे सुद्धा होऊ शकते त्यासाठी प्रयत्न करेन.
प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद, त्याचा सर्व गझल लिहिणाऱ्यांना उपयोगच होईल.
सोनाली