शब्दांवर हुकुमत दोन प्रकारची असू शकते : १) शब्दांनी डोळ्यांसमोर चित्र उभे करणे (उदा. पु. ल.) किंवा २) शब्दांनी एक वातावरण तयार करणे, या शैलीत शब्द जवळ जवळ स्वरांचं काम करतात (उदा. जी. ए.)
तुमच्या भाषा शैलीत दोन्हीही आहे. उत्तम व्यक्तीचित्रण आणि प्रभावी वातावरण निर्मीती. तुमची भाषा इतकी साधी (रॉ) आहे की तुम्हाला वातावरण निर्मीतीसाठी जी. ए. ना जशी स्वतःची वेगळी भाषा तयार करायला लागली तसे काही देखील करायला लागत नाही
मिलींद मुळीकनी त्याच्या 'स्केचबुक' या चित्रकलेवरच्या पुस्तकात म्हंटले आहे की : काय दाखवायचे, किती दाखवायचे आणि कसे दाखवायचे हा नजरीया म्हणजे चित्रकला! तुमची सगळी कथा, त्यातला प्रत्येक प्रसंग या तिन्ही पैलूंवर बेहद्द खरा उतरतो.
ही कथा इतकी प्रभावी असण्याचे कारण म्हणजे तुम्ही यातले अनुभव जगले असणार
शेवट अत्यंत संयत आहे आणि मला खूप आवडला. एखाद बेभान झालेलं गाणं सहज, लोकांना समजेल अशा पद्धतीनं समेवर यावं तसा हा शेवट आहे. विधायक शेवट नेहेमी कलाकाराचा सौंदर्यवादी दृष्टीकोन आणि जीवना विषयीची आस्था दर्शवतो
प्रतिसाद दोन्ही प्रकारचे येतील पण इतके विस्तारानी लिहीण्याचे एकच कारण आहे, नाऊमेद होऊ नका, तुमच्याकडे भाषा आहे, नजरीया आहे, असेच लिहीत राहा
संजय