ह्या कवितेत मला कोठे वृत्तदोष दिसला नाही. (चू. भू. द्या. घ्या. )

उद्धव वृत्त

गा  गागागागा  गागा - गा  गागागागा  गागा

असे तोडून लिहिले असते तर वृत्त अधिक स्पष्ट झाले असते असे मला वाटते.

उदा.

रस्ता भरलेला असतो - अन गर्दी साचत असते
जहरील्या फुत्कारांनी - हे विश्वच तापत असते

नाही म्हणायला

नेहमीच कसे विरोधी येतात विचार मनी ह्या

ह्या ओळीत लय सुधारण्यासाठी वाव आहेसे वाटते. त्यासाठी

नेहमी विरोधीच कसे - येतात विचार मनी ह्या

असा बदल सुचवावासा वाटतो.

जहरील्या शब्दाला काही पर्याय मिळाला तर बरे होईल असे वाटते. एक सुचवण -

फुत्कारांतून विखारी -  हे विश्वच तापत असते