नाही म्हणायला
नेहमीच कसे विरोधी येतात विचार मनी ह्या
ह्या ओळीत लय सुधारण्यासाठी वाव आहेसे वाटते.
- सहमत आहे. माझ्या मते, ह्या ओळीची लय किंचित विस्कळीत होण्याची दोन कारणे आहेत. एक, 'नेहमीच' मध्ये केवळ एका गुरूचे दोन लघू झालेले नाहीत तर त्या दोन लघुंच्यामध्ये गुरू मात्रा आलेली आहे. म्हणजे गा गा गा चे नुसते गा ल ल गा नाही तर गा ल गा ल झाले आहे. दुसरे कारण आहे 'नेहमी' ह्या शब्दाचा व्यक्तिगणिक बदलणारा उच्चार. काही जण 'नेहमी'मधील ह चा उच्चार पूर्ण करतात (नेहऽमी) तर काही त्याचा उच्चार हृस्व करतात (नेह्मी ). 'नेह्मीच् कसे विरोधी येतात विचार मनी ह्या' हे त्या मानाने लयीत वाटते पण 'नेहऽमीच कसे विरोधी येतात विचार मनी ह्या' खटकतं. सोनालीताईंनी ही गझल त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून इ-स्निपस् किंवा तत्सम संकेतस्थळावर चढवल्यास व त्याचा दुवा पुरवल्यास त्यांना अभिप्रेत उच्चार व, पर्यायाने, लय कळू शकेल.
त्यासाठी
नेहमी विरोधीच कसे - येतात विचार मनी ह्या
असा बदल सुचवावासा वाटतो.
काही शब्द बदललेले चालणार असतील तर
'का वारंवार विरोधी येतात विचार मनी ह्या'
असेही करता येईल.