एके काळी, शिकरण ही मराठी माणसाच्या कल्पनेतली समृद्धीची आणि सुग्रणपणाची निशाणी होती.
"निवृत्त झाल्यावर सरकारकृपेने एवढी पेन्शन मिळते की, शिकरणपोळीला मरण नाही". तसेच, "मामाची  बायको सुगरण, रोजरोज पोळी शिकरण", या उक्ती सुप्रसिद्ध आहेत. आमच्याकडे दाखवायला आलेल्या मुलीने घरात एका दोरीला टांगलेला केळीचा घड पाहिला आणि आम्ही फार श्रीमंत आहोत असे ठामपणे ठरवले. ती मुलगी आता ६५ वर्षाची आहे.