मी पुण्याला पी. एम. टी. नं कधी प्रवास करायचा योग(! ) आला, तर शेजारच्याचा संध्यानंद वाचण्याचा परमानंद घेतला आहे. (स्वतः हून हे वर्तमानपत्र कधी विकत घेतल्याचं आठवत नाही. )
हे एक जगावेगळं वर्तमानपत्र आहे आणि त्यांचे वार्ताहरही फार कुशल असावेत, असं माझं मत झालं होतं. कारण दुसऱ्या कुणालाही न कळणाऱ्या बातम्या आणि वैज्ञानिक शोध त्यांना अगदी रोज सापडतात.
थिल्लरपणाच्या बाबतीत टाइम्स ऑफ इंडिया नावाचं एक दुसरं (संध्यानंदसारखंच महागडं) वर्तमानपत्रही प्रसिद्ध होतं. आर. के. लक्ष्मण संध्यानंदमध्ये व्यंगचित्र काढत नाही, ही टाइम्सची एक जमेची बाजू. बाकी काय - टाइम्स हॅव चेंज्ड!
(त्या मानानं डीनए बरा, इंडियन एक्सप्रेस त्याहून बरा... पण त्याला मास अपील नाही आणि हिंदू त्याहूनही बरा, पण तो महाराष्ट्राच्या कामाचा नाही, असं माझं मत. 'मी सकाळ का वाचतो' हा स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल असं वाटतं.)
- कुमार