डॉ. विश्वास सापटणेकर हे पंचवीस वर्षे पंढरपुर वारी मेडिकल कँप करत आहेत. ते एकदा मला म्हणाले लंडनहून जेंव्हा आम्ही येतो तेंव्हा विठ्ठलाला काय वाटत असेल, त्याच्या मनात येत असेल का, की कसे असतील हे वारकरी? मी त्यांचे स्वागत कसे करू? आणि ह्या विषयावर मला कविता करण्यास सांगितले. मी नंतर सहज मनात येणारे विचार लिहिले, मात्रा, वृत्त काहीही नाही, व लंडनला पाठवून दिले. तेथे महाराष्ट्र मंडळात या कवितेचे वाचन काही दिवसांपुर्वी स्वर्गवासी झालेले भारत व लंडनमधील मराठी बांधवांचे मित्र श्री मधू अभ्यंकर ह्यांनी केले व शेकडो प्रती वाटल्या. अनेक मान्यवरांना कल्पना खुपच आवडली. एव्हढी पार्श्वभूमी सांगण्यामागे ऊद्देश इतकाच की लाखो रुपये खर्च करून ही मंडळी दरवर्षी फक्त निस्वार्थपणे वारक्ऱ्यांची सेवा म्हणून भारतात येत असतात. एखाद्याला यापासून स्फुर्तीही मिळेल कदाचित.