आजच्या म. टा. त हे वाचले.

माझ्या हाती सत्ता द्या, सगळा महाराष्ट्र सूतासारखा सरळ करून दाखवीन... असे सांगणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या तरी तमाम मोबाईल कंपन्यांना सूतासारखे सरळ केले आहे. मनसेच्या दणक्यानंतर, मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर सर्व मोबाईल कंपन्यांनी मराठीतून ग्राहकसेवा देण्यास सुरूवात केली असून, त्यामुळे ग्राहकांना आपल्या तक्रारी वा गाऱ्हाणी मराठी भाषेतून मांडणे शक्य झाले आहे.

मोबाईल कंपन्यांच्या हेल्पलाइन नंबरवर फोन केला असता, ग्राहकसेवा प्रतिनिधींकडून आतापर्यंत केवळ इंग्रजी वा हिंदीतूनच प्रतिसाद मिळत असे. परंतु मुंबई-महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर राज्याची राजभाषा असलेल्या मराठीतूनही ग्राहकसेवा सुरू करा, अशी तंबी मनसेने मोबाईल कंपन्यांना दिली होती. मराठी भाषेतून संवाद साधण्याची सेवा सुरू करण्यासाठी कंपन्यांना २७ फेब्रुवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती.
... ...

पुढे वाचा : मोबाईल कंपन्या सूतासारख्या सरळ