दत्ताराम या कथेवर प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचाच आभारी आहे. काहींना कथा कोलमडल्यासारखी वाटली तर काहींना आवडली.
उलटसुलट प्रतिसादांची अपेक्षा होतीच. या कथेतील दत्ता हा स्वतःला अतिशय कमी लेखणारा असा आहे. त्याचा त्याने स्वतःबर शिक्का मारून घेतला आहे. म्हणूनच तो रंजना बहिनीबद्दलच्या आकर्षणा पलिकडे जात नाही. आजूबाजूचे वातावरणही काहीसे जुने  व अंधश्रद्धाळू आहे‌ . सर्वांनाच विशिष्ट मर्यादेत राहण्याची सवय आहे. अशा परिस्थितीत कुठल्याही प्रकारचा फक्त आकर्षक शेवट हा अव्यहार्य वाटला असता. त्याने मित्राच्या घरी राहण्यास जाण्याचा मार्ग त्याला खात्रीचा वाटला असावा. अन्यथा रंजनावहिनी बरोबर पळून  जाण्याची क्षमता त्याच्यात नाही व साधारण आयुष्य जगण्याचा त्याला आत्मविश्वास नसावा. कथा दुसऱ्या  अंगानेही फुलविता आली असती पण  ती फिल्मी झाली असती. असो.
                           सदर कथेत जो गूढपणा आहे तो केवळ प्रातिनिधिक स्वरुपाचा आहे. माणसाला एखादी भविष्यातील घटना आधी कळली तरी तो फार तर भांबाऊन जातो पण काहीही करू  शकत नाही. संजय म्हणतात त्याप्रमाणे , मी स्वतः असा अनुभव घेतला आहे. पण त्याने मी भविष्यातील घटना टाळू शकलो नाही  . असा भास मलाही दुपारी झाला आहे व बरोवर दुसरा माणूसही होता, ज्याने मला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली होती. असो. हा तो विषय नाही. संजय यांनी माझ्या लिखाणाचे जे कौतुक केले त्याबद्दल आभारी आहे् अनुबंध व श्री जोशी यांचाही  मी आभारी आहे. ही कथा सलगतेने टंकलिखित करता आली नाही त्याला कारण एम टी  एन. एल ची नेट सेवा व  वीज मंडळाची वेळोवेळी झालेली मेहेरबानी.  कथा पूर्णपणे काल्प्ननिक असूनही रंजनावहिनी व दत्ता ही माणसं शेवटीशेवटी मला जिवंत वाटू लागली होती.
                          
                           असो. परत एकदा सर्वांचेच आभार. .