रस्ता भरलेला असतो अन गर्दी साचत असते
जहरील्या फुत्कारांनी हे विश्वच तापत असते... जहरील्या फुत्कारांनी विश्व तापणे?... कळले नाही..त्याचा रस्त्याशी काय संबंध?

ही ओळख नको कुणाशी मैत्रीही नकोच आता
दे इमेल, फोन व पत्ता ती नुसती बोलत असते.. अजून नीट रचता येइल काय?

तो तसाच बोलत असतो मी केवळ ऐकत असते
बाहेर बर्फ अन् मागे आधणही वाजत असते.... बर्फ वाजणे ही संकल्पना भारतातील लोकांना कळेल का?.. इथे फक्त गारा वाजतात हे माहिती आहे..

तेच ते विचारत बसतो, चौकशा किती ह्या करतो
(टोचले असे कापड की तग शिल्लक राहत असते?).. मिसरा कंसात का आहे ते कळले नाही?

एकट्या अबोल कळीवर भुंग्याला पाहत असता-
भेटावे तू ही इच्छा या मनास जाळत असते.... वा वा

ह्या वृत्तात गा गा गा इतक्या वेळेला आहे की श्री.मिलिंद फणसे ह्यांनी सुचविल्या प्रमाणे आपण ते  खरेच 'गा'ऊन दाखवावे:)
आपल्या रचना खरेच सुवर्णमयी व्हाव्यात ही शुभ-कामना
-मानस६