Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:
अर्थसंकल्पांचा आठवडा असल्याने वृत्तपत्रांसाठी तसा धामधुमीचाच. तरी भाजपाच्या राजवटीपासून अर्थसंकल्प संसदेत सकाळी मांडण्याची पद्धत अंगिकारली गेल्यामुळे पत्रकारांची धावपळ थोडी कमी झाली आहे. रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्पाचे सार आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न यावर्षीही आम्ही केला. अर्थात, बड्या वृत्तपत्रांच्या तुलनेत छोट्या वर्तमानपत्रांच्या कव्हरेजला मर्यादा येत असतात, परंतु या मर्यादा आपल्याला जाणवू नयेत यासाठी केलेली धडपड किती यशस्वी ठरली ते आपण ठरवायचे आहे.