Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:
विश्र्वचरित्रकोशकार श्रीराम कामत यांचे निधन ही दुःखद वार्ता या आठवड्यात ध्यानीमनी नसताना कानी आली. थोरामोठ्यांच्या सहवासात राहून त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत समृद्ध बनले होते. त्यांच्याशी बोलताना त्या अनेक आठवणी निघत असत. नवप्रभेतील बदलांविषयी ते सदैव कौतुकाने बोलत असत. गेल्यावर्षी श्री. कामत नवप्रभेत आवर्जून भेटायला आले होते, त्याची येथे प्रकर्षाने आठवण होते. येथील संपादकांच्या खुर्चीत बसवून आम्ही त्यांचे लेखनव्यग" मुद्रेतील फोटोही घेतले होते. गेल्या वर्षी त्यांची पंच्याहत्तरी साजरी झाली, तेव्हा सर्वांनी त्यांच्या विश्र्वचरित्रकोश ...