 |
|
होली के दिन..(येथे
ऐका)
जय
आणि वीरूने नुकतंच कालिया आणि मंडळींना हाकलून लावलं आहे त्यामुळे रामगढचे
गावकरी आता खुशीने होळी खेळताहेत. गळ्यात हार वगैरे घातलेला देखणा वीरू
आणि गोडगुलाबी अशी आमची बसंतीभाभी या जोडीचं हे होळीचं गाणंदेखील अतिशय
सुरेख! पंचमदांच्या संगीताचा परीसस्पर्श लाभला आणि हे गाणं होळीच्या रंगात
उत्साहाने रंगून गेलं..दिदि आणि किशोरदा खण्डवेवाल्यांची स्वर्गीय
गायकी!
गोरी तेरे रंग जैसा थोडासा मै रंग बनालू
आ तेरे गुलाबी गालोसे थोडासा मै गुलाल चुरालू!
वीरूदादा
बसंतीवर बाकी जामच फिदा आहेत.. :)
जा रे जा दिवाने तू होली
के बहाने तू
छेड ना मुझे बेसरम!...
'बेसरम'
या शब्दाचा उच्चार केवळ आमच्या दिदिनेच करावा! एकाकी जयदादाला देखील
गावकरी आग्रहाने रंगात नाचायला बोलावतात आणि जयदादाही दोन घटका अगदी छान
नाचतात.. इमामचाचाही खुश होऊन होळीचा नजारा पाहताहेत.. सारं गाव खुशीत
आहे..इकडे रंगबेरंगी होळी सुरू आहे आणि तिकडे ठाकूरची पांढर्या साडीतली
विधवा सून उभी आहे.. जयदादांचा जीव आहे तिच्यावर! :)
शोले
शिणेमातलं काय गाजलं नाही? अभिनय, संवाद, गाणी, पात्रांची नावं..!
एखाद्याने अगदी डॉक्टरेट करावी असा शिणेमा! मारे ऑस्कर्ड विजेते शिणेमे
जगभर निघाले, अजूनही निघतील.. पण जयवीरूच्या दोस्तीचा, ठाकूर-गब्बरच्या
दुश्मनीचा, बसंती-धन्नो-मौसीचा, सांभा-कालिया-रामलालचा हा सिनेमा पुन्हा
होणे नाही! :)
-- तात्या अभ्यंकर.