... करणे हा माजच समजला पाहिजे. अन्नाची नासाडी हा तर गंभीर प्रकार आहे. आमची आई नेहमी सांगे, जेवणाचे ताट आणि दारापुढचे अंगण आरशासारखे स्वच्छ दिसत असेल, तेथे बिनदिक्कत समजावे की त्या घरात सभ्य, सुसंस्कृत, सरळ मनाचे लोक राहात आहेत. घरातला कचरा तिने कधीही कचराडब्याव्यतिरिक्त इतर जागी टाकू दिला नाही. दिनदर्शिकेची मागची बाजू कोरी असेल, तर त्यावर ती गणिते सोडवून घेत असे.त्यामुळे या संवयी आमच्या आपोआपच अंगवळणी पडल्या.  अजूनही प्रसंगी आम्ही ताटे चाटूनही स्वच्छ करतो! अन्न आणि कचऱ्याविषयीची जागृती प्राथमिक शाळेपासून करून देणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे निदान पुढची पिढी तरी थोडीफार जागरुक राहील.
     आपण देत असलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.