माहितीपूर्ण लेख. समाजातील एका मोठ्या वर्गास याबद्दलची माहिती अगोदरच असावी, असे गृहीत धरले, तरीसुद्धा या समस्येबाबत फार काही स्पृहणीय उपाय अमलात आणले गेल्याचे दिसत नाही. यावर उपाय काय हे आपल्याला माहीत असल्याने कचऱ्याचे वर्गीकरण करून मगच तो कचरापेटीत सोपवावा, आणि यात अजिबात कसूर करू नये, याचे भान वैयक्तिक पातळीवर ठेवले जावे. आपल्यापासूनच सुरुवात करून हा नेम कधीही न मोडू देणे, आरंभशूरता टाळणे, हे इष्ट. महापालिकेची कर्तव्ये वगैरे मुद्दे त्यापुढचे आहेत, असे मला वाटते.