शमा - ए - महफ़िल येथे हे वाचायला मिळाले:
खूप वर्षांनी सलग आणि मोठा प्रवास ट्रेनने करण्याची संधी आली. नाहीतर 'वेळ वाचतो' या एका अपरिहार्य कारणामुळे दरवेळी फ्लाईटचाच पर्याय माझ्याकडून स्विकारला जातो. तरी ट्रेनने जाणार म्हटल्यावर- २०/२२ तासांचा प्रवास .. अगं किती बोर होशील? आणि किती वेळ फुकट जाणार प्रवासात. शिवाय ट्रेन पोचणारही अवेळी पहाटे. खूप त्रासाचं आहे टॅक्सीने शहरात जाणं.. मिळालेले एक नाही सतरा सल्ले आणि टीका चक्क कानाआड केल्या.