आमची आई नेहमी सांगे, जेवणाचे ताट आणि दारापुढचे अंगण आरशासारखे स्वच्छ दिसत असेल, तेथे बिनदिक्कत समजावे की त्या घरात सभ्य, सुसंस्कृत, सरळ मनाचे लोक राहात आहेत. घरातला कचरा तिने कधीही कचराडब्याव्यतिरिक्त इतर जागी टाकू दिला नाही. दिनदर्शिकेची मागची बाजू कोरी असेल, तर त्यावर ती गणिते सोडवून घेत असे.
असे संस्कार करणाऱ्या माऊलीचे कौतुक वाटते. आपण नशीबवान. 'खाऊन माजा, पण टाकून माजू नका" असे माझी आई म्हणते. इथे कुणाच्या आर्थिक परिस्थितीचा प्रश्न नाही, हा वृत्तीचा प्रश्न आहे. दुर्दैवाने हे असले विचार कालबाह्य होत चालले आहेत की काय, अशी शंका येते. अर्थात सगळ्याच आदर्शवादी विचारांची ही स्थिती आहे म्हणा.