समयोचित आणि कळकळीने लिहीलेला सुंदर लेख! आवडला!!
चवथ्या मजल्यावरून शिळे वरण भिरकावून देणारे, पहिल्या मजल्यावरून गॅलरीतून खाली तोंड धुणारे, गावाच्या वेशीवर प्रवेशद्वारासभोवतीच हागणदरी निर्माण करणारे, जागोजाग गुटक्याची रिकामी पाकिटे भिरकावून देणारे, चांगल्या स्वच्छ जागांवर पानाच्या पिंका टाकणारे लोक आपल्यात आजही भरपूर आहेत. स्वतःकरता आणि इतरांकरता, तसेच भावी पिढ्यांकरता स्वच्छ सुंदर वसुंधरेचा वारसा सोपवण्याचे कर्तव्य सगळ्यांनीच मनावर घेण्याची आवश्यकता आहे. अशात, ओल्या कचऱ्याच्या निस्सारणासंबंधित उपायांना उजागर करणारा हा लेख इथे लिहील्याखातर मनःपूर्वक धन्यवाद. मला निस्सीम आशा आहे की संबंधितांना यापासून यथोचित प्रेरणा मिळेल.
तरीही आपण सर्वांनीच या विषयावर चिंतन, शोध आणि वर्तनाचे दायित्व स्वीकारावे हीच प्रार्थना!