प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

@संजोप राव, तात्या जरी कट्टर संघ कार्यकर्ता असले तरी कसही करून मुलगा अमेरिकेत/परदेशात स्थायिक झाला की बेताची असलेली आर्थिक परिस्थिती आणखी सुधारू शकेल अशी त्याना आशा होती. त्यामुळे त्यानी बंडूला सायन्सला जाण्याची जबरदस्ती केली असावी. मुलगा अमेरिकेलाच गेला पाहिजे असा काही तात्या हट्ट धरून बसले नाहीत. पुढे ते त्याला कॉंप्युटर कोर्स करण्यासही सांगतच  होते. तसंच तात्यांना बंडू बाटला की काय अशी सुरुवातीला फक्त शंका होती.  पण तो खरंच बाटलाय हे लक्षात आल्यावर त्यांच्या मनावर प्रचंड आघात झाला. त्यांची तब्येत बिघडण्यामागे हे देखील एक महत्त्वाचं कारण होतं.  शिवाय बंडू बाटलाय हे शक्यतोवर मिलिंदाला कळू नये असंही तात्यांना वाटत होतं. म्हणूनच ते त्याला खोलीत जाण्यापासून अडवत होते.

@ श्रावण मोडक, फुल्यांच्या जागी अर्वाच्य शिवी आहे हे लक्षात घ्या. अर्थात शिव्या जशाच्या तशा लिहायला काहीच हरकत नाही. पण कदाचित सगळ्याच वाचकांना ते रुचणार नाही. तसेच तात्यांनी अमूक एक शिवी दिली आहे असंही काही नाही. फुल्यांच्या जागी आपण 'म', 'भ' किंवा 'चु' पासून सुरू होणाऱ्या कोणत्याही शिवीची कल्पना करू शकतो.

पुन्हा एकदा प्रतिसादाबद्दल धन्यवाद. दिलसे.