मात्र कशाचीच माहिती नसते. मीं जेमतेम अठ्ठाविशीचा असतांना एकदां एका
कारखान्यांत एका गरोदर झाडूवालीला बालदीभर पाणी आणायला सांगितलें. फार कडक
आणि शिस्तप्रेमी होतों मीं, आणि माझा दराराही मोठा होता. माझ्याभोंवती
पॅकिंग खात्यांतल्या पांचसहा मुली आणि राणा नांवाचा एक पारशी मध्यमवयीन
पुरुष रसायनज्ञ होता. सगळे माझ्याकडे टकमक पाहायला लागले. राणानें मला
बाजूला कार्यालयांत नेलें आणि सांगितलें कीं प्रेग्नंट वीमेन शूड नॉट
लिफ्ट एनि हेवी वेटस. मी लगेच येऊन पडेल चेहऱ्यानें दिलगिरी व्यक्त केली.
तोपर्यंत एक मुलगी पाणी आणायला गेली पण होती. पण मी कसा मठ्ठ आहे आणि मला
कांहींच कसें कळत नाहीं या कल्पनेनें सर्वांना मस्त हसू फुटलें होते.
असो. आपला हृद्य लेख वाचतांना अशा अनेक स्मृती जाग्या झाल्या.
ट्रॅकवरच्या छोटीचें वाचतांना अंगावर काटा आला. महाभयंकर.
सुधीर कांदळकर