आहेत. ओरायन या ग्रंथांनीं टिळकांनीं मृगशीर्षाच्या बदललेल्या स्थानावरून वेदकाल निश्चित केला होता. आपल्या पूर्वजांचें (वानरांचे नव्हे) तसेंच राजादिकांचे तत्कालीन लेखक, कवी, महाकवींनीं केलेलें उदात्तीकरण म्हणजेच देवत्त्व अशी माझी साधीसोपी सरळ व्याख्या आहे. अर्थात धार्मिक लोक आपल्या देवदेवतांच्या बाबतीत अतिसंवेदनाशील आणि असहिष्णू आढळतात. याचें कारण देवत्व ही संकल्पना आपल्या रेप्टाईल ब्रेन वा लिंबिक नर्व्हज मध्यें नोंदवली गेली असली पाहिजे. त्यामुळें ती जेव्हां जागृत होते तेव्हां तीवर वैचारिक मेंदूचा ताबा राहात नसावा. तरीही माझ्यासारख्या देवाचें अस्तित्त्व मान्य न करणारांनीं आस्तिक लोकांच्या भावनेचा मान ठेवला पाहिजे.
असो, डॉ. नारळीकर, डॉ. माशेलकर, डॉ. कलाम, बाबा आमटे, फुले, आगरकर, र. धों. कर्वे, महर्षी कर्वे, जी ए कुलकर्णी, चि. त्र्यं खानोलकर, बालकवि, कुसुमाग्रज, मदर तेरेसा तसेंच यशवंत देव आणि कपिल देव इ. मंडळी हे देखील माझ्यासाठीं ३३ कोटी + देवच आहेत.
सुधीर कांदळकर