तसेंच मामी आणि आजी या तिघींचे देखील आम्हां मुलांवर अस्सेच संस्कार झाले आहेत.
गोळे साहेब म्हणतात त्याप्रमाणें
जागोजाग गुटक्याची रिकामी पाकिटे भिरकावून देणारे, चांगल्या स्वच्छ जागांवर पानाच्या पिंका टाकणारे लोक आपल्यात आजही भरपूर आहेत
पण बसमधून, रेलवेगाडीतूनहि लोक तंबाखू खातात व पिंका टाकतात. त्यांना देखील आपण निदान मुंबईत तरी विरोध करून यशस्वीपणें थोपवूं शकतों. कारण मुंबईत कायदा सुव्यवस्था आहे आणि अशा कार्याला सहप्रवासी लगेच पाठींबा देतात. मीं तर थुंकण्यावरून एका वेळीं दोघातिघांशीं पण पंगा घेतला आहे. मुख्य म्हणजे मारबीर न खातां. बीईएसटीचा वाहक - कंडक्टर साथ देतो. इतर शहरांचे ठाऊक नाहीं.
कांहिं नाहीं तर आपण ओला कचरा, कोरडा कचरा आणि अ-नाशिवंत कचरा असा तीन प्रकारचा कचरा वेगळा करून देऊं शकतों.
एका चांगल्या लेखाबद्दल संजोप रावांना धन्यवाद. पुढील भागाची वाट पाहात आहे.
सुधीर कांदळकर