सोनाली,
 
हा निरोपक (शब्द) आवडला व आपलासा झाला लगेच.  कथा आवडली सगळे वर्तमान संदर्भ आल्याने जवळची वाटते.  जीवंत वाटते.
 
तो निरोपक ती निरर्थक संभाषणे ही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा भाग होऊ शकतात व स्वतःपासून पळ काढण्याचे साधन देखील होऊ शकतात.  म्हणून ती सुरवातीला त्या निरोपकाने आणि शेवटी पुन्हा आपल्या त्याच निरोपकाने तू एक सुंदर सांकेतिक सिद्धांत माडला आहेस.  वर आलेल्या मतांपेक्षा हे माझे एक वेगळे मत.
 
(संभाषणप्रीय) तुषार