कथेत पाणीखातं, एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी इंजिनियर, हे शब्द आल्यामुळे आपल्या डोळ्यासमोर प्रथम कुठली गोष्ट आली असेल तर ती म्हणजे सरकारी खात्यांतला भ्रष्टाचार. साहजिक आहे. पण काही वेळ भ्रष्टाचाराचा मुद्दा बाजूला ठेवून, किंबहुना खात्याशी संबंधित कथेतील पात्रं ही सरकारी खात्यातील नसून एका मोठ्या मल्टिनॅशनल (प्रायव्हेट) कंपनीचे कर्मचारी (म्हणून भ्रष्टाचारमुक्त) आहेत असं समजून कथेत आपल्याला काय आढळतं (किंवा मुळात काही आढळतं का? ) ते पाहावं ही विनंती.