आमच्या सहकारी वसाहतीमध्ये, केर टाकताना त्याचे ओला आणि ओरडा असे विभाजन करावे आणि फक्त कोरडा कचराच केराच्या टोपलीत टाकावा, असा दंडक आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच कसोट्यांवर पुढारलेली आणि 'सुसंस्कृत' मंडळीच बहुसंख्येने राहत असलेल्या आमच्या वसाहतीत हा ओला-कोरडा फरकच कोणाला समजत नाही अशी तक्रार घरोघरचा कचरा गोळा करणारे शिपाईकाका करतात तेंव्हा त्या दहावी पास माणसापेक्षा आपण सगळे ढ आहोत असेच वाटायला लागते.
लेखाचा विषय अतिशय महत्त्वाचा असूनही सोयिस्करपणे दुर्लक्षित ठेवलेला आहे. पुण्यातला कचरा फुरसुंगीच्या कचरा डेपोमध्ये 'डम्प ' करण्याच्या विरोधात काही महिन्यांपूर्वी झालेले आंदोलन एव्हाना विस्मृतीत गेले असले तरी पुढे काय वाढून ठेवले आहे याची ती केवळ एक झलक होती असे मानायला जागा आहे. 'आल इज वेल' म्हणत प्रांतिक राजकारणांमधे दंग झालेले पुणे मनपा चे नगरसेवक(! ) आणि समस्त पुणेकर बहुतेक कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहत नाही या म्हणीचा प्रत्यय येईल तेंव्हाच जागे होतील आणि मग मात्र जिवंत राहण्यासाठी ही कचऱ्याची 'ओली-सुकी' करण्यावाचून पर्याय राहणार नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते.
लेख उत्तम झाला आहे. अशाच खारीच्या ओंजळींनी एक दिवस कचरा निर्मूलन आणि पर्यावरणरक्षणाचा हा रामसेतू पूर्ण होवो ही सदिच्छा आणि स्वयंसेवकगिरी करण्याची माझ्यातर्फे इच्छा आणि तयारी.
--अदिती