ते भाषेने म्हणजे पर्यायाने लोकांनी ठरवायचे आहे आणि त्यांचा निर्णय जसा आहे तसे मराठी आज बोलले जाते, माध्यामातून दिसते.
इतर भाषेतून आलेले सर्व शब्द काढून टाकले तर किती शब्द राहतील आणि मराठी भाषा कशी असेल याचे मला कुतूहल आहे. ही कविता केवळ कल्पनाविलास आहे का? की कविता लिहिण्याहे कारण मराठी स्वतंत्र होणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते का ? त्यावर आपले मत काय आहे? त्यादिशेने अभ्यास सुरू आहे का?याविषयी जाणून घ्यायला आवडेल.