थोपणे मराठी आहे हे दाखवल्याबद्दल धन्यवाद. थोपणे चा अर्थ मोल्सवर्थनुसार थांबणे, रोखणे असा आहे. मात्र वर म्हादूंच्या प्रतिसादात त्या अर्थाने थोपणे चा वापर झालेला नाही. नाहीतर हिंदी सर्व बाजूंनी रोखली जाते असा अर्थ होईल. त्यांच्या प्रतिसादातील थोपण्यावर हिंदी थोपणे म्हणजे लादण्याचाच प्रभाव आहे.