संजोपराव,
अतिशय आवश्यक असलेला लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद! तुमचा लेखही अतिशय अभ्यासपूर्ण आहे.
लहान असताना म. टा. च्या वक्तृत्वस्पर्धेत भाग घेतला होता. त्यातला एक विषय होता - 'वैयक्तिक चांगल्या सवयी जडल्या, पण सामाजिक सवयींचं काय? ' - हे भारतात अगदी पदोपदी (कचरा करणे, हॉर्न वाजवणे इ. बाबतीत) जाणवतं. परदेशी लोकांचे काही वाखाणण्यासारखे गुण आहेत, त्यातला सामाजिक सवयी हा एक नक्कीच.
मला वाटतं हा एक शालेय शिक्षणातला विषय करावा आणि शिक्षकांनाही त्यासाठी प्रशिक्षित करावं. पान खाणे हा सांस्कृतिक ठेवा यासाठी शाळेच्या द्वाराच्याबाहेरच (पिंकदाणी बघून, नाहीतर घरीच) ठेवून येणं गरजेचं.
पानात टाकणारे लोक हे सामाजिक गुन्हेगार आहेत अशी भावना विकसित झाली पाहिजे.
(या बाबतीत शिक्षणासाठी होस्टेलल्या राहिलेल्या विद्यार्थ्यांचा अनुभव जाणून घेण्यासारखा आहे. होस्टेलला राहाणे आणि मेसला जेवणे यांमुळे अन्नाबद्दलचा आदर वाढीस लागतो असा स्वानुभव आहे! ) - पूर्णतः सहमत!
- कुमार