विचारांच्या झुळुका येथे हे वाचायला मिळाले:

थ्री ईडियट्समधे वसतीगृहामधिल जीवन बरेच मनोरंजकरीत्या दाखविले आहे. काही प्रसंग तर अगदी सुंदर आणि सहज झालेले आहेत. मुख्य अभिनेत्यांचे काम सहज, भूमिकांशी एकरूप होवून झालेले आहे. चित्रपटाचा वेग बर्यापैकी जमलेला आहे. गोष्ट सोपी पण प्रेक्षकांना गुन्तवून ठेवणारी आहे. एकूण काय तर खिचड़ी नीट शिजलेली आहे.

मला आणि माझ्या मित्रांना (आणि बऱ्याच प्रेक्षकांना) आपल्या विद्यार्थीजीवनातले अनेक प्रसंग आठवले. दिग्दर्शक हिरानीने या छोट्या प्रसंगांतून चित्रपट पुढे नेलेला आहे. हे प्रसंग अत्यंत सहजपणे आणलेले आहेत - ओढून ताणून आणलेले वाटत नाहीत. ...
पुढे वाचा. : थ्री ईडियट्स - माझे भाष्य