संजोपराव,

आपला लेख आवडल्याचे सागितले होतेच. आज थोडे जाणून घेण्यासाठी हा लेखनप्रपंच...

आपण लिहिता-

मोठ्या शहरातील दाट लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण इतके प्रचंड आहे, की त्यापुढे निसर्गाची ही पुनर्निर्माण करणारी व्यवस्था अपुरी पडते, कोलमडूनच जाते. अशा कचऱ्याचे ढीग साठत गेले की या जीवाणूंना विघटनासाठी लागणारा ऑक्सीजन त्या ढीगांमध्ये खोलवर उपलब्ध होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत ऑक्सीजनच्या अभावामध्ये काम करणारे जीवाणू (अनएरोबिक ऑरगॅनिझम्स) वाढीस लागतात.

मोठ्या शहरांत माणसांची आणि माणसाने निर्माण केलेल्या साधनांची संख्याच इतकी वाढली आहे की निसर्गाचा समतोल पूर्णपणे ढासळला आहे. मानवनिर्मित कचरा आणि मानवनिर्मित साधनांतून निर्माण होणारे प्रदुषण इतके प्रचंड आहे की उरलेल्या निसर्गाची पुनर्निर्माण व्यवस्थाच कोलमडून गेली आहे.


आपण म्हणता तसे कचऱ्याचे ढीग न साठवता थोडा थोडा कचरा असेल आणि  विघटन करणाऱ्या जीवाणूंना पुरेसा प्राणवायू मिळाला तर विघटन व्यवस्थित आणि पूरेसे होऊ शकेल का?

आमच्या वसाहतीत ओला कचरा हा "बायोगॅस" प्रकल्पासाठी वापरला जातो. त्यातून निर्माण होणाऱ्या गॅसवर उपहारगृहातील चुली व्यवस्थित पेटतात. अर्थात बायोगॅस असा जाळून टाकण्यापेक्षा त्याचा सदुपयोग नवीन वनस्पती निर्माण करण्यासाठी करावा असे मला वाटते. त्याचा खत म्हणून कसा वापर केला जाऊ शकेल यावर प्रयोग आणि चर्चा होणे गरजेचे आहे.

अर्धवट विघटन पावलेले पण पूर्ण कुजलेले सेंद्रीय पदार्थ ( ज्याला स्थूलमानाने ह्यूमस असे म्हणता येईल. ) या ह्यूमसचे जमीनीतील प्रमाण वाढले की जमीनीची सुपीकता ही वाढते

विघटन आणि कुजणे यामध्ये काय फरक आहे?   अर्धवट / पूर्ण विघटन किंवा कुजणे हे जरा अधिक स्पष्ट करणे. कारण खालील वाक्यांतून थोडे बावचाळल्यासारखे होते.

हे ही जीवाणू विघटनाचे कार्य करतात खरे, पण ते या सेंद्रीय कचऱ्याचे पूर्ण विघटन करू शकत नाहीत.   व या अर्धवट कुजलेल्या कचऱ्यापासून दुर्गंधीयुक्त पदार्थांची निर्मिती होते. ( उदा. हायड्रोजन सल्फाईड). मग माशा, कीडे, डास हे दुष्टचक्र सुरू होते.

आजच्या "लोकसत्ता" मधील लेखही वाचावा. जेजूरीचा खंडोबा- प्लॅस्टीकच्या विळख्यात