भाऊसाहेबांचे अजून काही शेरः
            अपुल्याच हाती, ओठ अपुला चावणे नाही बरे
            हक्क अमुचा आमुच्या समोरी मारणे नाही बरे

कुंतलांना सांग तव जे धावले गालावरी,
दुर्बलांनी रक्षिले का होते कोणा केव्हातरी? 

          इतुक्याच साठी लाविला ना हात मी तनुला तिच्या
          भोगायची मज फक्त होती लाज गालीची तिच्या

भ्रमरापरी सौंदर्यवेडे आहो जरी ऐसे आम्ही,
नाही कुठे प्रेमात भिक्षुकी केली आम्ही