आपल्या महाराष्ट्रातच एवढे भाषावैविध्य आहे की त्यातूनही अनेकदा घोटाळे होतात. आमच्या मंगळवेढा गावच्या परिचितांच्या मुलाचे पुण्याजवळच्या गावातील मुलीशी लग्न झाले. मुलाला नव्यानेच पुण्यात नोकरी लागली होती. तिने कधीही त्याला भाजी आणायला सांगितली की तो कोथिंबीर सोडून सर्व घेऊन यायचा... कारण त्याच्या डोक्यात कोथिंबिरीसाठी 'सांबर' हा त्यांच्या प्रांतात रुढ असलेला शब्द इतका फिट होता की त्याला कोथिंबीर सांगितल्यावर कळायचेच नाही! आणि तो 'सांबर' म्हणू लागला की तिला इडली-सांबारातले सांबार वाटायचे! पुढे मग सवय झाली :-)