मला वाटते की  सचिनला भारत रत्न पुरस्कारासाठी किमान १० वर्षे वाट पाहावी लागेल. याचे कारण वेगळेच आहे. 
कारण माझ्या माहिती नुसार भारत रत्न ने गौरवली गेलेली सर्वात कमी वयाची व्यक्ती आहेत स्व. राजीव गांधी. 
त्यांना त्यांच्या वयाच्या ४७ व्या वर्षी भारतरत्न दिले गेले. 
सचिन काही गांधी घराण्यातील नाही. त्यांच्यापेक्षा लहान वयाच्या व्यक्तीला भारत रत्न मिळणे हे काही जणांच्या दृष्टीने अडचणीचे ठरेल. म्हणून सचिन ४७ वर्षाचा होईपर्यंत किमान काँग्रेस सरकार तरी त्याला भारत रत्न होऊ देणार नाही.