जे अनुभवलं ते आम्ही दर अंगारकीला अनुभवत आहोत्! फरक एव्हढाच की मध्यरात्री प्रचंड आरडाओरड करीत येणारी मंडळी  गणपती बाप्पा मोरया-उंदिरमामा की जय असल्या गर्जना करीत असतात. यांना हटकण्याची सोय नाही. पोलीस झोपा काढत नसतात, असे म्हणायचे. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रे किती लाख भक्त येऊन गेले त्याची आकडेवारी कौतुकाने देतात. या सामाजिक हतबलतेतून आम्ही कधी आणि कसे बाहेर येणार कुणास ठाऊक ?
सार्वजनिक दुःखाला वाचा फोडलीत्, धन्यवाद.